मोठी बातमी! कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Jul 11, 2023 | 12:53 PM

राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. भुजबळांना मारण्याची सुपारी आपल्याला मिळाली आहे. त्यांना मी उद्याच मारणार आहे, आपण सांगून काम करतो, म्हणून तुम्हाला सांगतो आहे, असंही फोन करणाऱ्याने सांगितलं आहे. या धमकी प्रकरणानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात पुण्यातील एका तरूणाला ताब्यात घेतलं आहे. धमकी आल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

Published on: Jul 11, 2023 12:53 PM
जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर भुजबळ यांनी दोनचं शब्दात दिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘अशा धमक्या पवार…’
पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या आधी ‘हे’ करावं; राऊत यांचा खोचक सल्ला