Video | त्यांना जाऊन सांगा भुजबळांना काढा म्हणून, पत्रकारांच्या प्रश्नावर भुजबळ संतापले

| Updated on: Jan 29, 2024 | 5:49 PM

ओबीसीमध्ये आधीच 374 जाती होत्या. आता त्या हजार होतील. सर्व आरक्षण बलदंड लोक पळवतील. आमचं आरक्षण संपल्यात जमा आहे. त्यामुळे आपण लढत आहोत. ओबीसीच्या प्रश्न आणि चिंतेपुढे मला कोणत्याही पदाची अभिलाशा नाही असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आपण या प्रश्नावर एकटे नसून राज्यातील आणि देशातील कोट्यवधी ओबीसी माझ्या बाजूने आहेत असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. तुम्ही सरकारमध्ये राहून हा लढा देणार की बाहेर पडणार असे विचारत छगन भुजबळ यांचा पारा वाढला आणि त्यांनी...

मुंबई | 29 जानेवारी 2024 : मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रावर आरक्षण देण्याचा जीआर काढल्याने मंत्री छगन भुजबळ संतापले आहेत.ओबीसी लढ्यात मी एकाकी नाही राज्यातील आणि देशातील सुद्धा करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. आमच्यात आधी 374 जाती होत्या आता त्या हजार होतील. सगळं आरक्षण जे आहे ते आता बलदंड लोकं घेऊन जाणार आमचं आरक्षण संपल्यात जमा आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही बोलतो आहोत असे ते म्हणाले. तुम्ही या मुद्द्यावरुन सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडणार ? असे विचारले असता भुजबळांनी ते त्यांनी ठरवावे, माझ्या पार्टीने ठरवावे, मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही चिंता नाही. मला ओबीसीच्या प्रश्नाचं दु:ख आणि चिंता याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. त्यांना तुम्ही जाऊ सांगाना याला काढा म्हणून असा उलट सवाल भुजबळांनी पत्रकारांकडे पाहून केला.

Published on: Jan 29, 2024 05:47 PM
…तर मंडल कमिशन चॅलेंज करणार मी, जरांगे पाटील यांनी दिला इशारा
गांधीजींचा मृत्यू गोडसेच्या गोळीमुळे नाही, रणजीत सावरकरांच्या पुस्तकात दावा