Chhagan Bhujbal Helped Accident Victims | अपघातग्रस्तांच्या मदतीला भुजबळ धावले
छगन भुजबळ यांनी अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक : माजी मंत्री छगन भुजबळ हे अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावल्याचे दिसून आले. छगन भुजबळ हे मुंबईहून नाशिककडे येत होते. रस्त्यात कसारा घाटात अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली. या गंभीर अपघातात वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. छगन भुजबळ यांनी अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या.
Published on: Aug 19, 2022 10:33 PM