Video : बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अन् औरंगाबादचं नामांतर; छगन भुजबळ यांची सविस्तर प्रतिक्रिया…

| Updated on: Feb 25, 2023 | 1:34 PM

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाचा दाखला दिला आहे. पाहा भुजबळ काय म्हणालेत...

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाचा दाखला दिला आहे. “औरंगाबादचं नाव बदलण्यात यावं, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षापासून मागणी होती. महाविकास सरकार सत्तेत होती त्यावेळच्या मंत्रिमंडळानेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन्ही ठराव मंजूर केले होते.आता तो निर्णय पुर्णत्वास गेल्याचा आनंद आहे. थोडे दिवस आता जे लोक संभाजीनगर न वापरत नव्हते त्यांच्या तोंडात औरंगाबाद वगैरे येत राहील. पण हळूहळू सवय होईल. विमानात बसल्यानंतर अलाउन्स मेंट होईल. शब्द कानावर पडतील तेव्हा संभाजीनगर, धाराशिव म्हणायची सवय होईल”, असं छगन भुजबळ म्हणालेत.

संजय राऊत यांची टीका म्हणजे मोठा जोक! उद्धव ठाकरेदेखील खळखळून हसत असतील; कुणाचं टीकास्त्र?
औरंगाबादचं नाव बदलल्याने गोपीचंद पडळकर यांच्याकडून सरकारचे आभार; ‘या’ शहराचंही नाव बदलण्याची मागणी