मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्याच; मराठी भाषा दिनी छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

| Updated on: Feb 27, 2023 | 12:24 PM

आज मराठी भाषा दिन आहे. त्यानिमित्त माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाहा...

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनकाळात विविध मुद्द्यांवर बोललं जातंय. आज मराठी भाषा दिन आहे. त्यानिमित्त माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्याच, अशी मागणी मराठी भाषा दिनी छगन भुजबळ यांची सभागृहात केली. मराठी भाषेचं वय अडीच हजार वर्षे आहे. मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. त्यासाठी राजकारणमध्ये न आणता पाठपुरावा केला जावा, अशी मागणी भुजबळ यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

Published on: Feb 27, 2023 12:24 PM
हस्तांदोलन करण्यासाठी आशिष शेलार यांनी हात पुढे केला, पण संतोष बांगर थेट पायाच पडले…
कांद्याचे दर 2 ते 4 रुपयांपर्यंत कोसळले; महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक