छगन भुजबळ यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा; म्हणाले, “मला जबाबदारी दिली तर…”

| Updated on: Jun 23, 2023 | 7:46 AM

राष्ट्र्वादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्ष संघटनेत संधी द्यावी, अशी मागणी करत अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केल्याचं म्हटलं जात आहे. यावरून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.याच पार्श्वभूमीवर आता "प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन", असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यपदावरून अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्र्वादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्ष संघटनेत संधी द्यावी, अशी मागणी करत अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केल्याचं म्हटलं जात आहे. यावरून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.याच पार्श्वभूमीवर आता “प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की, “राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी समाजाला द्यायला हवे. भाजपने ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केलं. काँग्रेसनेही ओबीसी चेहऱ्याला संधी दिली. राष्ट्रवादीतही ओबीसी चेहरे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी. सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड हे ओबीसी चेहरे आहेत. त्यांना संधी द्यायला हवी. मला संधी मिळाली तर मीही काम करेन.”

 

 

Published on: Jun 23, 2023 07:46 AM
“तुझा बाप बोलतोय…माजला का तू?”; संदीपान भुमरे यांच्याकडून कार्यकर्त्याला शिवीगाळ
संदीपान भुमरे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय? पाहा स्पेशल रिपोर्ट…