मंदिरातील ड्रेस कोडवरून छगन भुजबळ यांची खोचक टीका; “ते पुजारी अर्धनग्न नसतात का?, मग त्यांनीही…”

| Updated on: May 29, 2023 | 12:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं रविवारी उद्घाटन केलं. तसेच इतर विविध पुजा यावेळी करण्यात आल्या. यावेळी अनेक पुजारी तिथे उपस्थित होते. यावरून आता टीका होऊ लागली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वर्तन लाज आणणारं आहे",असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता छगन भुजबळ म्हणाले. "सेंगोल एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायची प्रथा असेल. अरे इथे राजाचा संबंध येतो कुठे? ही लोकशाही आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं रविवारी उद्घाटन केलं. तसेच इतर विविध पुजा यावेळी करण्यात आल्या. यावरून आता टीका होऊ लागली आहे. “सेंगोल एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायची प्रथा असेल. अरे इथे राजाचा संबंध येतो कुठे? ही लोकशाही आहे.  जनता ही राजा आहे. हे सर्व करून पंतप्रधानांनी केलं ते खरोखर वेदना देणारं होतं. हे लोकशाहीचं मंदिर आहे. आपण सर्व धर्मीयांना घेऊन चालवणार हे आपलं संविधान आहे. अशावेळी आपण जे काही करत आहोत, ते जगही पाहत आहे. हा एवढा चांगला कार्यक्रम त्यांना करता आला असता, पण काय करणार?”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणी केली. तसेच मंदिरातील ड्रेस कोड पद्धतीवरही छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. शाळेला सुट्टी लागल्यावर एखादा मुलगा मंदिरात हाफ पँट घालूनच जाणार ना… म्हणे ती हाफ पँट आहे. अरे…हा तर मूर्खपणा आहे. नीटनेटके कपडे घालावे हे मी समजू शकतो. सर्वांनीच जर नीटनेटके कपडे घालायचे असतील तर आतमध्ये जे उघडेबंब असतात ना पुजारी त्यांनी सुद्धा अंगात सदरा घालावा. गळ्यात माळ घातल्यावर कळेल हा पुजारी आहे. ते सुद्धा अर्धनग्न नसतात का?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

Published on: May 29, 2023 12:32 PM
संजय राऊत याचं पुन्हा एक ट्वीट आणि मविआत एकच खळबळ? विरोधकांना आयतं कोलीत
कधी राख रांगोळी होईल सांगता येत नाही, भाजप नेत्याचा एकनाथ खडसे यांना सूचक इशारा