सर्व राज्यकर्त्यांना बुद्धी दे;भुजबळांचं बाप्पाकडे साकडं

| Updated on: Aug 31, 2022 | 1:28 PM

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांना या संकटातून सावरण्याचं बळही त्यांना मिळावं असं साकडंही त्यांनी गणरायाकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांना शक्ती दे, बुद्धी दे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली आहे.  

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गणेशोत्सवाचे रुप पालटून गेले होते, शांततेत पार पडणारा गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव होत असल्याने सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत जोरदारपणे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी गणेशाकडे सर्व राज्यकर्त्यांना बुद्धी दे असं साकडं बाप्पांकडे त्यांनी घातले आहे. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांना या संकटातून सावरण्याचं बळही त्यांना मिळावं असं साकडंही त्यांनी गणरायाकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांना शक्ती दे, बुद्धी दे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

Published on: Aug 31, 2022 01:28 PM
धनंजय मुंडे यांच्या घरी 10 दिवसांसाठी गणेशाचं आगमन
Ganesh Chaturthi 2022: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाऊ रंगारी गणपतीची स्थापना