शरद पवार यांना ‘तुतारी’, छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच….
नाशिक मालेगाव येथील एका गावात छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी भुजबळ यांनी या कार्यकर्त्यांपैकी काही जण भुजबळ कुटुंबियांनी प्रवेश केला तर त्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. हे योग्य नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
नाशिक | 24 फेब्रुवारी 2024 : मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मालेगाव येथील गावात अडवून त्यांना मराठा समाजाने काळे झेंडे दाखविण्याचा प्रकार नुकताच झाला होता. या प्रकारावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी लोकांना काळे झेंडे दाखविण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. पंकज तेथे यदाकदाचित निवडणूकीत उभा राहीला तर मतदानांतून लोकांना त्यांचा अधिकार गाजविता येतो. परंतू तेथील काही कार्यकर्ते भुजबळ कुटुंबियांचे हातपाय तोडू अशा घोषणा देत होते. हे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर गृहखाते योग्य ती कारवाई करेल असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे तुतारी चिन्हांनी काही फरक पडणार नाही. गावखेड्यातील लोकांनी शरद पवार म्हणून जरी मतदान करायचे ठरविले तरी ते शरद पवारांना मतदान करताना घड्याळालाच करतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 24, 2024 05:22 PM