पब्लिकली भांडण्यापेक्षा भुजबळांनी राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना सल्ला

| Updated on: Jan 29, 2024 | 3:06 PM

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. भुजबळांनी ओबीसींवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ओबीसींची सर्वपक्षीय बैठक बोलावून राज्य सरकारच्या सगेसोयरे अध्यादेशाविरोधात हरकती मांडण्याचे आवाहन केले आहे. भुजबळांनी रडत बसण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

वाशिम | 29 जानेवारी 2024 : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी सातत्याने भूमिका मांडणारे मंत्री छगन भुजबळ सध्या प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. राज्य सरकारने मराठामधील कुणबी नोंद असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर भुजबळांनी संताप व्यक्त करीत ओबीसींना एकत्र करण्याची मोहीम सुरु केली आहे. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना सल्ला दिला आहे. भुजबळ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी अशा प्रकारे पब्लिकली भांडण्यापेक्षा थेट कॅबिनेटमध्ये आपले म्हणणे मांडावे असा सल्ला दिला आहे. भुजबळांचे ऐकले जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून थेट बाहेर पडावे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. भुजबळांना एकाबाजूला सत्ता उपभोगायची आणि रडतही रहायचे अशा दोन्ही भूमिका घेणे योग्य नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. भुजबळांनी राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 29, 2024 03:06 PM
Budget 2024 | अर्थसंकल्पाचे नियोजन सरकार कसे करते ? कसा पैसा खर्च होतो
…तर मंडल कमिशन चॅलेंज करणार मी, जरांगे पाटील यांनी दिला इशारा