आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर; छगन भुजबळ नाराज, म्हणाले…

| Updated on: Jul 22, 2023 | 8:33 AM

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक, 22 जुलै 2023 | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत.यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे येताय आनंद आहे. निवडणुकासुद्धा आहेत, त्यानुसार प्रत्येक पक्ष फिरतोय. अधिवेशनाला सुट्टी असल्याने ते बाहेर येत आहेत. संभाजीनगरपर्यंत जात आहे. अगदी पंधरा वर्षांपूर्वी आले असते तर फरक कळला असता.”

Published on: Jul 22, 2023 08:33 AM
२४ तासात केबिन रिकामी करा, नाहीतर…; आदित्य ठाकरे यांचा लोढा यांच्या केबिनवरून थेट इशारा
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?