“शरद पवार म्हणाले, आमच्याकडे माजी मुख्यमंत्री अन् दिग्गज नेते, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

| Updated on: Apr 03, 2023 | 10:20 AM

Arvind Sawant on Uddhav Thackeray :2019 ला नेमकं काय झालं? शरद पवार नेमकं काय म्हणाले? उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कसं आलं? ठाकरेगटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठा खुलासा केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी ठाकरेगटाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी मोठा खुलासा केला आहे. “आम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग केला त्यावेळेस शरद पवार म्हणाले काँग्रेसकडे दोन मुख्यमंत्री आहेत. आमच्याकडे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या खाली काम करणार आहेत का? मग शरद पवार साहेबांनी सांगितलं की उद्धवजी हे शिवधनुष्य तुम्हाला उचलायला लागेल. मग उद्धवजींनीही पवारांच्या शब्दाला मान दिला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, असं अरविंद सावंत म्हणालेत.

Published on: Apr 03, 2023 10:16 AM
काल तब्बेतीचं कारण आणि आज थेट गुजरात दौरा? नाना पटोलेंवर प्रश्न चिन्ह
2024 पर्यंत देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न, बंगालमध्येही भाजपपुरस्कृत हिंसाचार-संजय राऊत