नामांतराविरोधात छ. संभाजीनगर बंदची हाक; मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली

| Updated on: Mar 10, 2023 | 10:34 AM

लोकविकास परिषद आणि इतर संघटनानी औरंगाबाद नामांतर विरोधात छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे

छ. संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिवच्या नामांतराच्या निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली. त्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. तसेच सध्या बेमुदत साखळी उपोषण सुरू असून गुरूवारी रात्री कँडल मार्च देखिल काढण्यात आला. आता औरंगाबाद नामांतर विरोधात छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे. ही हाक लोकविकास परिषद आणि इतर संघटनानी दिली असून याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी’, शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरलं अन् मांडली व्यथा
शिवजयंतीनिमित्त पुण्यात साकारला शिवनेरी किल्ल्याचा देखावा अन् रंगले मर्दानी खेळ