छ. संभाजीनगरमध्ये तीन मोठे रस्ते हे वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण जाणून घ्या
मिल कॉर्नर ते खडकेश्वर, खडकेश्वर ते भडकल गेट आणि भडकल गेट ते पोस्ट ऑफिस असे तीन रस्ते हे बंद राहणार आहेत. तर सभेला येणाऱ्यांसाठी कर्णपुरा मैदानावर असेल पार्किंची व्यवस्था करण्यात आली आहे
छ. संभाजीनगरमध्ये : छ. संभाजीनगरमध्ये आज रविवार महाविकास आघाडीची सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्याची जोरदार तयार झाली असून तब्बल 1 लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तर येथे येणाऱ्यांना थेट येता यावं यासाठी संभाजीनगरमधील वाहतुकीत फेरबदल करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या जाहीर सभेसाठी येथील तीन मोठे रस्ते हे वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. हे रस्ते दुपारनंतर बंद केले जातील. मिल कॉर्नर ते खडकेश्वर, खडकेश्वर ते भडकल गेट आणि भडकल गेट ते पोस्ट ऑफिस असे तीन रस्ते हे बंद राहणार आहेत. तर सभेला येणाऱ्यांसाठी कर्णपुरा मैदानावर असेल पार्किंची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांसाठी हर्सूल सावंगी रस्त्यावर मनाई करण्यात आली आहे. त्यांना केम्ब्रिज चौक जालना रोड मार्गे कर्णपुरा मैदानावर येणाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.