छत्रपती संभाजीराजे ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’, राष्ट्रवादीच्या बॅनरवर काय?
पुण्यातील स्वारगेट येथे राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या बॅनरवर छत्रपती संभाजीराजे यांचा मोठा फोटो झळकत आहे. मात्र, या बॅनरवर त्यांचा उल्लेख...
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( AJIT PAWAR ) यांनी छत्रपती संभाजी महाराज ( CHATRPATI SAMBHAJI MAHARAJ ) यांना ‘स्वराज्य रक्षक’ असे संबोधले होते. त्यावरून शिंदे गट आणि भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मात्र, अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.
आज पुण्यातील स्वारगेट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक बॅनर लावला आहे. यात संभाजी महाराज यांचा मोठा फोटो झळकत असून त्यावर मोठ्या अक्षरात संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक असे म्हटले आहे.
त्याखालीच अजित पवार यांचा फोटो असून राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. संभाजी महाराज यांचे बलिदान क्षेत्र तुळापूर आणि समाधी क्षेत्र वढू बुद्रुक विकासासाठी महाविकास आघाडीने निधी मंजूर केल्याच्या अभिनंदनाचा हा बॅनर लावण्यात आला आहे.
Published on: Jan 13, 2023 11:20 AM