Sambhaji Raje | छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढणार, मात्र संभाजीराजे भुमिकेवर ठाम

| Updated on: May 18, 2022 | 9:22 PM

संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या ऑफरनंतरही संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेचा 6 जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होत आहे. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलंय. सर्व राजकीय पक्षांकडे त्यांनी सहकार्याचं आवाहनही केलं आहे. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिलाय. मात्र, शिवसेनेनं संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या मार्गात खो घातल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दोन उमेदवार देणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. इतकंच नाही तर संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या ऑफरनंतरही संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Published on: May 18, 2022 09:22 PM
Special Report | बृजभुषण सिंहांना केद्रीय मंत्र्यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध वाढला-tv9
Special Report | केतकी चितळेवर 17 ठिकाणी गुन्हे …कुठं कुठं अटक होणार ?