छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला औरंगजेबाचं नाव, कडाडून विरोध, अखेर मोठा निर्णय

| Updated on: Mar 06, 2023 | 11:03 AM

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं. त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली होती. औरंगजेबाच्या नावाला होणारा विरोध पाहता पुढच्या काही वेळातच मोठा निर्णय घेण्यात आला. पाहा...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरामधील चौकाला दिलेले आलमगीर औरंगजेब असं नाव देण्यात आलं होतं. ते नाव अखेर मिटवण्यात आलं आहे. जालना रोडवरील चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं होतं. चिकलठाणा चौकात असणाऱ्या डिव्हाईडरला औरंगजेबाचे नाव दिलेलं होतं. चौकाला औरंगजेबाचे नाव देताच संतापाची लाट निर्माण झाली होती. औरंगजेबाच्या नावाला होणारा विरोध पाहता पुढच्या काही वेळातच हे नाव मिटवण्यात आलं.

Published on: Mar 06, 2023 10:59 AM
2024 ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं…
आम्ही नव्हे, उद्धव ठाकरे तुम्हीच गद्दार!; रामदास कदम यांचे गंभीर आरोप