मविआच्या सभेवर तिसऱ्या डोळ्याची नजर, वज्रमुठ सभास्थळी पोलीस दक्ष
राड्यानंतर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा होणारे आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे
छ. संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात असणाऱ्या राम मंदिरासमोर दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस दक्ष झाले आहेत. राड्यानंतर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा होणारे आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. तर मविआच्या वज्रमूठ सभेवर पोलिंसांची बारिक नजर असणार आहे. सभेस्थळी पोलिसांकडून पोलिसांची सीसीटीव्हीद्वारे नजर असणार असून तब्बल 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
Published on: Apr 02, 2023 09:13 AM