किराडपुरा राड्याप्रकरणी पोलीसांची कारवाई सुरू; आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

| Updated on: Apr 02, 2023 | 8:55 AM

या प्रकरणी एकूण 23 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. तर या प्रकरणानंतर पोलीस प्रचंड सतर्क झाल्याचं पहायला मिळत आहे

छ. संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात असणाऱ्या राम मंदिरासमोर दोन गटात जोरदार राडा झाला. ज्यानंतर अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता येथे तणावपुर्ण शांतात आहे. यानंतर आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी एकूण 23 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. तर या प्रकरणानंतर पोलीस प्रचंड सतर्क झाल्याचं पहायला मिळत आहे. काल दिवसभरात साधारण दहा पथकातील 50 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात आली. तर तब्बल 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आता ताब्यात घेतलेला आरोपींची संख्या ही 23 वरती पोहोचलेली आहे.

Published on: Apr 02, 2023 08:55 AM
संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच तिन्ही पक्षांची दिसणार वज्रमूठ
मविआच्या सभेवर तिसऱ्या डोळ्याची नजर, वज्रमुठ सभास्थळी पोलीस दक्ष