छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून 9 अल्पवयीनांना अटक; काय आहे प्रकरण?
संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटात धक्का लागल्याने झालेल्या वादाचं पर्यवसान तुफान राड्यात झालं होतं. धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर : येथील किराडपुरा भागातील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 75 अरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अटक करण्यात आलेल्या अरोपींमध्ये 9 अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. यामुळे किराडपुरा हिंसाचारात अल्पवयीन मुलांचा सहभाग होता हे आता मोर येत आहे. संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटात धक्का लागल्याने झालेल्या वादाचं पर्यवसान तुफान राड्यात झालं होतं. धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली. दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही या जमावाने टार्गेट केलं. पोलिसांवर दगडफेक करतानाच पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. या राड्यात तब्बल 20 वाहने जाळण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस अजूनही कसून चौकशी करत आहेत.
Published on: Apr 20, 2023 09:25 AM