संभाजीनगर नामांतरणानंतर जलील यांनी विष ओकलं; त्यांच्याचमुळे… दानवेंचा आरोप
विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यासह भाजपवर टीका केली होती. आताही त्यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे
मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसात काही ठिकाणी दोन गटांमध्ये राडे झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर मधील राड्यात पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. त्यानंतर विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यासह भाजपवर टीका केली होती. आताही त्यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. तसेच येथील झालेला राडा हा नियोजीत कट होता असेही त्यांनी म्हटलं आहे. तर याची बीजे ही जलील यांनीच रोवली असाहा घणाघात त्यांनी केला आहे. तसेच भाजपवर निशाना साधताना भाजपने देखील विष पेरण्याचे काम केलं. भाजपचे राजा भैया हे येथे कशाला येतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. तर इम्तियाज जलील यांनी आंदोलनात चिथावणीखोर भाषण केलं आहे. त्या भाषणाची तपासणी पोलिसांनी करावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
Published on: Mar 31, 2023 12:57 PM