दोन धर्मात दंगल भडकतील असं नेत्यांनी बोलू नका : भाजप नेत्याने सभेवरून मविआला सुनावलं

| Updated on: Apr 02, 2023 | 7:17 AM

भाजप नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मविआला सल्ला दिला आहे. त्यांनी, महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यांनी सभा घ्यावी तो त्यांचा अधिकार आहे

नांदेड : छ. संभाजीनगरमध्ये आज रविवार महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्याची जोरदार तयार झाली असून तब्बल 1 लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, संभाजीनगरातील किराडपुरा भागात दोन गटात राडा झाल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. या सभेमुळे येथील वातावरण खराब होऊ नये यासाठी मविआने काळजी घेतली पाहीजे असा सुर भाजप आणि शिंदे गटाकडून निघत आहे. यावरूनच भाजप नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मविआला सल्ला दिला आहे. त्यांनी, महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यांनी सभा घ्यावी तो त्यांचा अधिकार आहे. पण सभेत दोन धर्मात दंगल भडकतील असं नेत्यांनी बोलू नये असं म्हटलं आहे. तर संभाजीनगरला जाऊन त्यांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी सारख बोलू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Published on: Apr 02, 2023 07:17 AM
Special Report | छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण शांत, आता मैदान अन् ‘मविआ’चे नेते सज्ज
मुंबईत बॉम्ब स्फोट झाले तेव्हा…; फडणवीस यांच्या राजीनाम्यावर मुनगंटीवार चांगलेच भडकले