सहानुभूती कोणाला बेनिफिट अजितदादांना; शिरसाट यांचा राष्ट्रवादीवर हल्ला

| Updated on: Apr 02, 2023 | 12:07 PM

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मविआच्या या सभेवर, उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. शिरसाट यांनी, आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे फक्त गद्दारल, खोके हेच बोलणार. त्यांच्याकडे दुसरा विषय नाही

छत्रपती संभाजीनगर : येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मविआची जंगी सभा होणार आहे. त्याआधी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मविआच्या या सभेवर, उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. शिरसाट यांनी, आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे फक्त गद्दारल, खोके हेच बोलणार. त्यांच्याकडे दुसरा विषय नाही. तर आजच्या सभेत संविधानाची शपथ घेणार आहेत म्हणे, पण जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्यांच्या नातू ज्यांच्याबरोबर तुमची युती झाली प्रकाश आंबेडकर कुठे आहेत? ते का नाहीत असा सवाल ही त्यांनी केला. तर ठाकरे यांना फक्त लोकांचा वापर करायचा आहे. मात्र खरा फायदा हा राष्ट्रवादीला होणार आहे. उद्या कोणालाही विचारा मुख्यमंत्री कोण होणार तेव्हा नाव अजित पवारांचं असेल. अजित पवारच का तर आता उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिलं असा प्रश्न त्यांचे लोक करतील. त्यामुळे सध्या सहानुभूती उद्धव ठाकरे यांना असलीतरिही त्याचा फायदा मात्र अजित दादा घेणार असे शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 02, 2023 12:07 PM
विमानाने वऱ्हाड घेऊन, बाबा चला माझ्या लग्नाला म्हणत ते येणार; शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंवर टीका
‘त्याला’ रेड्याचं दुध काढायचं माहित आहे; राऊतांवर शिवसेना नेत्याकडून पलटवार