औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचं उपोषण; उपोषणाच्या मंडपातच बिर्याणीवर ताव!

| Updated on: Mar 06, 2023 | 12:27 PM

MIM Uposhan Biryani Video : एमआयएमच्या वतीने औरंगाबादच्या नामांतराविरोधात उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात बिर्याणीची पंगत बसल्याचा प्रकार समोर आला आहे. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर झालं आहे. औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखलं जाणार आहे. याला एमआयएमने विरोध केलाय. एमआयएमच्या वतीने या विरोधात उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात बिर्याणीची पंगत बसल्याचा प्रकार समोर आला आहे. उपोषणाच्या मंडपातच उपोषणकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारला. एमआयएमच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. साखळी उपोषणासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारला. उपोषणकर्त्यांसाठी खास बिर्याणीची सोय करण्यात आली होती. यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published on: Mar 06, 2023 12:27 PM
राज ठाकरे यांच्या सभेलाही तुमच्यापेक्षा जास्त गर्दी होते; शिवसेनेच्या नेत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही!; शिवसेनेच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल