उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात नाही; कुणाची टीका?

| Updated on: Apr 08, 2023 | 2:32 PM

शरयू नदी पवित्र आहेच मात्र ज्यांनी गंगा मैली करून टाकली आहे. त्यामुळे हे लोक शरयु नदीत जातील किंवा गंगेत जातील काहीही फरक पडणार नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात आहे काय?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. शिवसेना प्रमुखांचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन त्याचं पूजन करायला अयोध्येला चालले आहेत. याआधी उध्दवसाहेब अयोध्येत जाऊन आलेत. त्यांनी मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात कोणतंही मोठं काम नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अजित पवारांना काही प्रायव्हसी आहे की नाही? एखादी दिवस नॉट रिचेबल राहिले तर काय होतं का? वेगळं मत मांडलं म्हणून लगेच महाविकास आघाडीत मतभेद आहेत असं समजायचं कारण नाही, असंही दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Published on: Apr 08, 2023 02:32 PM
आदित्य ठाकरेंना जमिनीवर आणायचं काम शिंदेंनी केलं; अयोध्या दौऱ्याच्या टीकेवर शिवसेनेच्या नेत्याचं उत्तर
पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक; ‘या’ कारणासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र