“राहुल गांधी मातोश्रीवर आले तर नवल वाटायची गरज नाही!”

| Updated on: Apr 15, 2023 | 11:36 AM

Chhatrapati Sambhajinagar News : उद्धव ठाकरे, राहुल गांधी अन् मातोश्री; विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य नेमकं काय? पाहा...

छत्रपती संभाजीनगर : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी मातोश्रीवर आले तर फार काही वेगळं आणि नवल वाटायची गरज नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरेजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणाले ते काही चुकीचं नाही. कारण गृहमंत्रालयाच्या कारभार फडतूस पद्धतीनेच सुरू आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुलवामा घटना घडली, अशी चर्चा त्यावेळी देशात सुरू होती. काश्मिरी राज्यपालांच्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. खरंच मोदी सरकारने असं केलं असेल तर जवानांचा हा अपमान आहे, असंही दानवे म्हणाले आहेत.

Published on: Apr 15, 2023 11:18 AM
महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावू नका; काँग्रेस नेत्याचा भाजपवर पलटवार
अमित शाह नेमकं मुंबई दौऱ्यावर का येतायत? संजय राऊत यांनी थेट कारणच सांगितलं