“मविआ सत्तेसाठी एकत्र, पण त्यांचे विचार एक नाहीत! त्यामुळे वज्रमूठ सभा यशस्वी होणार नाही”

| Updated on: Apr 17, 2023 | 3:13 PM

Chhatrapati Sambhajinagar News : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर भाजप नेत्याचं टीकास्त्र; पाहा संपूर्ण व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. “तीन विचारांचे पक्ष एकत्र येऊन वज्रमुठ सभा घेत आहेत. हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पण यांचे विचार एक नाहीत. हे फिजिकलीसोबत असले तरी मेंटली हे लोक एकत्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभा यशस्वी होणार नाहीत, असं भागवत कराड म्हणाले आहेत. फक्त अजित पवारच अस्वस्थ नाहीत. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यात अस्वस्थता आहे, विचार एक नसल्यामुळे ही अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे ती अस्वस्थता कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही, असंही भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 17, 2023 11:39 AM
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील दुर्दैवी घटनेवर संजय राऊत स्पष्टच म्हणाले, ‘श्री सदस्यांचा विचार न करता…’
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एकाचा मृत्यू