महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ‘त्या’ ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Chandrashekhar Bawankule on Anjali Damania Tweet : त्या ट्विटमुळे राज्यात सत्तांतराची चर्चा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर : राज्यात पुन्हा सत्तांतर होणार का? अशी शंका उपस्थित करणारं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. या ट्वीटवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजलाी दमनिया यांनी केलेल्या ट्विटला काहीही अर्थ नाही. यावर टिप्पणी केल्यास सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे मी त्यावर फारसं काही बोलणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा मिळेल असं बोललं जात असेल तर त्याला अर्थ नाही. कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल. मात्र सध्या शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आहे आणि हेच जनतेचं मत आहे हाच जनतेचा कौल आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Published on: Apr 12, 2023 11:28 AM