2024 ला पंकजा मुंडे कोणत्या मतदारसंघातून लढणार?; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
2024 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजप कोणत्या मतदारसंघात उमेदवारी देणार? यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : येत्या 2024 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजप कोणत्या मतदारसंघात उमेदवारी देणार? याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे कुठे लढणार हा निर्णय आम्ही घेत नाही. आमचं संसदीय मंडळ घेतं.त्यामुळं याबाबत चर्चा सुरू असण्याची गरज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील कटुता कमी होत असेल तर आनंद आहे. परिवारात कटुता नको हेच आपले संस्कार आहेत. हे नातं अधिक घट्ट व्हावं, हीच माझी प्रार्थना आहे. परळी वैजनाथला मी हीच प्रार्थना करतो. मनभेद दूर केले हे उत्तम आहे. त्यांनी एकत्र काम करायचं, असाही निर्णय घेतला तरी उत्तमच आहे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
Published on: Apr 12, 2023 02:34 PM