Bazar Samiti Election Result 2023 : छत्रपती संभाजीनगरमधील तीन बाजार समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात

| Updated on: Apr 29, 2023 | 10:13 AM

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आज तीन बाजार समितीचा निकाल लागणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर ,कन्नड आणि वैजापूर बाजार समितीचा फैसला होईल.

छत्रपती संभाजीनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. छत्रपती संभाजीनगरमधील तीन बाजार समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. छत्रपती संभाजी नगर, वैजापूर आणि कन्नड या तीन बाजार समित्यांची मतमोजणी सुरू झाली आहे. तर लासुर बाजार समितीची मतमोजणी उद्या होणार आहे. ग्रामीण भागात आपलं वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. या ठिकाणी अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे असा सामना रंगतोय. तर दुसरीकडे सर्वाधिक चुरशीच्या असलेल्या कन्नड बाजार समितीमध्ये सर्वाधिक उमेदवार आणि सर्वाधिक पॅनल असलेल्या या बाजार समितीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Published on: Apr 29, 2023 10:13 AM
नाशिकच्या शेतकऱ्यांची अवकाळी काही पाठ सोडेना, उभी पिके आडवी, बळीराजाचं अतोनात नुकसान
मुंबईत अवकाळी पावसाची रिमझिम, सकाळपासून ढगाळ वातावरण, कुठं बरसल्या सरी?