छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 30000 कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, रुग्णांचे हाल

| Updated on: Mar 14, 2023 | 9:29 AM

संपाचा थेट परिनाम मराठवाडा आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय, निमशासकी, शिक्षक आणि शिक्षेत्तर कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी यल्गार पुकारला आहे. त्याबाबत संपाचे अस्त्र काढले आहे. त्याचा संपाचा थेट परिनाम मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तर एकट्या घाटी रुग्णालयातील साधारणपणे 800 परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. ज्यामुळे अरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर तब्बल 30000 कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि जोपर्यंत योजना लागू होत नाही तोपर्यंत संपावर ठाम असल्याचं आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी निर्धार केला आहे.

Published on: Mar 14, 2023 09:29 AM
भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश; वडील सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; ठाकरे गटाकडून जोडपत्र सर्वोच्च न्यायलयात सादर