छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा झोडपलं; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 08, 2023 | 12:02 PM

Chhatrapati Sambhajinagar Rain Update : छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा झोडपलं आहे...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा या गावाला सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास वादळाचा तडाका बसला. त्यामुळे गावातील विजेचे लोखंडी पोल हे अर्ध्याहून पूर्ण वाकून गेले. तसंच काही घरावरील आणि शेतातील शेड वरील पत्रेदेखील उडाले. तर कन्नड तालुक्यात देखील तशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे पहिल्या पावसाने उरलेसुरले पिकंदेखील जमीनदोस्त झाली आहेत. सिल्लोडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहा:कार घातला. यामध्ये शिरसाळा येथील एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

Published on: Apr 08, 2023 08:31 AM
पुन्हा अवकाळीचा धुमाकूळ ; पुढील 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज
अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या 50 फेऱ्या बंद; एसटी महामंडळाला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका