‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; संजय शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांची महिला आयोगाकडे तक्रार
Sushma Andhare Complaint Against Sanjay Shirsat : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पाहा....
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाच्या च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये बोलताना संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं शिरसाट यांचं वक्तव्य आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. महिलांबाबत अशी वक्तव्य करणं योग्य नाही, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या आहेत.
Published on: Mar 28, 2023 12:35 PM