छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा गारपीट; कांद्याच्या पिकाचे झाले नुकसान
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखिल मागीस काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. आताही जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीने झोडपल आहे. येथील गंगापूर तालुक्यातील तीन ते चार गावांना गरपिटीचा फटका बसला असून शेतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गरपिटीमुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
Published on: Apr 15, 2023 08:25 AM