Nagpur MVA Sabha : ठाकरे गटाच्या नेत्याची टीका; स्थानिकांचा विरोध आणि पोलिस बंदोबस्त, काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 12, 2023 | 9:22 AM

भाजपच्या पोटात पोटशूळ असल्यानं सभा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी टीका केली आहे. यानंतर आता स्थानिक आक्रमक झाले असून ते आंदोलनाला बसले आहेत

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेनंतर महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपुरात 16 एप्रिलला होणार आहे. ही येथील सुधार प्रण्यास मैदानात होणार असून त्यासाठी जंगी तयारी सुरू आहे. मात्र याच्याआधी भाजपसह स्थानिक नागरिकांनी ही सभा येथे होऊ नये यासाठी विरोध केला आहे. हे मैदानात खेळासाठी असून लहान आहे असे म्हणत सभा येथे होऊ नये यासाठी भाजपकडून विरोध केला जात आहे. तर भाजपच्या पोटात पोटशूळ असल्यानं सभा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी टीका केली आहे. यानंतर आता स्थानिक आक्रमक झाले असून ते आंदोलनाला बसले आहेत. तर आता हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published on: Apr 12, 2023 09:22 AM
Ajit Pawar News : अजित पवारांशी संबंधीत कंपनीवर गुन्हा दाखल, मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख ईडीने टाळला?
अन् भरपत्रकार परिषदेत प्रिया बेर्डे रडल्या; पाहा व्हीडिओ…