संजय शिरसाट यांची अनेक लफडी, लवकरच बाहेर निघतील; कुणाचा घणाघात?

| Updated on: Mar 27, 2023 | 3:53 PM

Shivsena Sanjay Shirsat : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यावर ठाकरेगटाच्या नेत्यांनी टीका केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाठ यांची अनेक लफडी आहेत. काढली तर त्यांची अनेक लफडी निघतील. आताच ते गोव्याला जाऊन जुगार मध्ये हरून आले, किती हरले त्यांना माहीती आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. “सुहास कांदे या कांद्याचा लिलाव कितीला झाला. हे उध्दवसाहेबांनी काल सांगितलं आहे. कांदे यांचं बोलणं वैफल्यातून आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरे अत्यंत पारदर्शक नेते आहेत. त्यांनी मी महापौर असताना कधीच काहीच विचारलं नाही. त्यामुळे सुहास कांदे यांचीच नार्को टेस्ट करावी म्हणजे त्यांचे लफडे बाहेर येतील, असं म्हणत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर नंदू घोडीले यांनीही टीका केली आहे.

Published on: Mar 27, 2023 03:53 PM
राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले, LIC, SBI आणि EPFO पैसा…
‘दिखावे पे मत जाओ; अपनी अक्कल लगाओ’, शिवेंद्रराजे यांचा उदयनराजेंवर निशाणा