कोंबडी चोर तुझी किमंत…? ठाकरे गटाच्या नेत्याने काढली नितेश राणे यांची किंमत
उद्धव ठाकरे यांनी माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला उपनेता केलं. त्यामुळे राणे यांची हातभर नाही कोसभर xxx आहे. मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केली तर त्यांना मी सोडणार नाही याची भीती निर्माण झालीय.
सोलापूर : 17 ऑक्टोबर 2023 | भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर टीका केली. शरद कोळी यांची शिवसेना उपनेता म्हणून निवड झाल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांचा उल्लेख ब्लॅकमेलर असा केला. नितेश राणे यांच्या या टीकेला शरद कोळी यांनीही राणे कुटुंबियांवर पलटवार केलाय. बाजारात चार आणे आणि राजकारणात नारायण आणि नित्या राणे याला काडीमात्र किंमत नाही, अशी टीका कोळी यांनी केलीय. मुळात राणे कुटुंबच गुन्हेगार आहे. नित्या राणे गुन्हेगार आहे, नारायण राणे गुन्हेगार आहे. राणे कंपनीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यांच्यावर कोंबडी चोरीचा गुन्हा दाखल आहे. कोंबड्या चोरत यांनी माणसे मारली यांची ओळख महाराष्ट्रात गुन्हेगार आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी माझ्यावर बोलू नये अशी जळजळीत टीका शरद कोळी यांनी केलीय. नितेश राणे तुला जे समजायचं असेल ते समज. पण, जर यापुढे उद्धवजी, आदित्य ठाकरेंवर टीका केली तर तुला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला.