निवडणुका 2024 ला मग आयोगाची आत्ताच धावाधाव कशासाठी? जिल्ह्या दौऱ्यांचे कारण काय?

| Updated on: May 29, 2023 | 10:14 AM

देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात होणाऱ्या चर्चांना उत आला आहे. यादरम्यान त्यांनी देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

मुंबई : काही दिवसांपुर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आम्ही दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात होणाऱ्या चर्चांना उत आला आहे. यादरम्यान त्यांनी देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. मात्र त्याच्याआधीच आता निवडणुकीच्या अनुशंगाने राज्य तसेच केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागलेलं आहे. ते जिल्ह्यानिहाय बैठका घेत आहेत. त्यावरून दोन्ही निवडणूका एकत्र होण्याची शक्यता आहे. तर प्रप्त माहितीच्या आधारे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांनी इतर कोणतीच कामं सांगितली जाऊ नये असेही आदेश काठण्यात आल्याचे कळत आहे. आतापर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा पुणे, विदर्भ यांचा दौरा पूर्ण झाला असून संभाजीनगर आणि कोकणातील काही भागांचाही त्यांनी दौरा केला आहे. महाविद्यालयांतील 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या युवक-युवती यांची नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.

Published on: May 29, 2023 10:14 AM
राधाकृष्ण विखे पाटील विरोधकांवर संतपाले; म्हणाले, “मान्यता संपत चालल्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र…”
काल वडिलांचं निधन, चंद्रपूरातील काँग्रेसचे एकमेव खासदार यांची प्रकृती चिंताजनक