मुख्यमंत्री चटर पटर, अजित पवार बटर, भाजप नेत्याने का केला असा उल्लेख ?
ज्यांना गद्दार म्हणून हिणवले जाते ते गद्दार आहेत की खुद्दार ते येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. दूध हा दूध आणि पाणी का पाणी होईल. पुणे येथील दोन्ही जागा आम्ही जिंकू.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली होती. पण, आता नवीन कुणी चटर पटर आलेत आणि ते पक्ष नेते आहे म्हणून सांगताहेत, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चटर पटर आहेत तर अजित पवार अमूल बटर आहेत का ? असा टोला लगावला आहे. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे सरकारवर टीका करण्यावाचून त्यांना गत्यंतर नाही. त्यांचे ते काम आहे, जबाबदारी आहे. घोडा मैदान लांब नाही. ज्यांना गद्दार म्हणून हिणवले जाते ते गद्दार आहेत की खुद्दार ते येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. दूध हा दूध आणि पाणी का पाणी होईल. पुणे येथील दोन्ही जागा आम्ही जिंकू. अजित पवार यांचे राष्ट्रवादीत अस्तित्व काय आहे ते महाराष्ट्र पहात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील सगळ्यात बेटर असा मुख्यमंत्री आहे असा टोलाही त्यांनी लगावला.