Abdul Sattar Court order | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ – tv9
आता आता थेट निवडणुकीच्या अनुशंगानेच चौकशीचे आदेश आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकारणी चौकशीचे आदेश सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत.
राज्यात सत्तापरिवर्नासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खंबीर साथ देणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आधी सत्तार यांचे नाव टीईटीच्या घोटाळ्यात समोर आलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र टीईटीच्या घोटाळ्यात त्यांचा संबंध नसल्याचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी दिले आणि सत्तारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली होती. यानंतर आता आता थेट निवडणुकीच्या अनुशंगानेच चौकशीचे आदेश आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकारणी चौकशीचे आदेश सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत. तसेच याचा अहवाल दोन महिन्यात न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश ही न्यायालयाने दिले आहेत. तर निवडणुकीदरम्यान सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती भरली नसल्याप्रकरणी सामाजित कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी याचिका दाखल केली होती.