एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अचानक साथसाथ, मुख्यमंत्री ओव्हरटेक करून गेले; काय घडलं?
विक्रोळीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा ताफा समोरासमोर. शिंदेंचा ताफा उद्धव ठाकरेंच्या बाजूने वेगानं पुढे निघून गेला.
मुंबई, 13 जानेवारी 2024 : मातोश्रीवरून उद्धव ठाकरे हे आज कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर जात असताना अचानक विक्रोळीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यामागे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आज उद्धव ठाकरे यांचा आज श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात दौरा. ठाकरे कल्याण-डोंबिवलीमधील शाखांना भेटी देणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी.
Published on: Jan 13, 2024 11:57 AM