आदित्य ठाकरेंना जमिनीवर आणायचं काम शिंदेंनी केलं; अयोध्या दौऱ्याच्या टीकेवर शिवसेनेच्या नेत्याचं उत्तर
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आता कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्याची जोरदार तयारी राज्यासह उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आता कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी टीकेणंच उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या काळात रामराज्य होतं. ते आम्ही संपवलं. आता तेच आणण्यासाठी आम्ही अयोध्याला रामाचं दर्शन करायला जात आहोत. शिंदे साहेबांनी रामाचं नाही तर रावणाचं राज्य संपवलं. त्याच्याच काळात रावणाचं राज्य होतं. त्यामुळेच कोणाला भेटी नाही, गाठी नाही. हवेत चालत होते आदित्य ठाकरे. त्यांना जमिनीवर आणायचं काम शिंदेंनी केलंय. तेव्हा आता बोलायला पाहिजे. पण लोकांना सगळं दिसतय म्हणूनच ही आपुलकी तयार होत आहे.