‘हे’ मतासाठी रामाची आरती करतात; काँग्रेस नेत्याचा शिंदेवर घणाघात

| Updated on: Apr 10, 2023 | 9:05 AM

आम्ही, "राम के नाम वोट" मागणारे नाही. श्रीराम हे आमच्या हृदयात आहेत. हृदयातून रामाची पूजा आम्ही करतो. आणि हे मतांसाठी रामाची आरती करतात.' आरतीसाठी जे शरयू नदीच्या काठावर आहेत, जनता त्यांना नदीत ढकलल्याशिवाय राहणार नाही.

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांना चांगलेच सुनावलं. त्याचबरोबर त्यांच्या टीकेला उत्तर देताना, रामभक्तच विरोधकांना त्यांची जागा दाखवतील अशी बोचरी टीका केली होती. त्या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री विरोधकांना जागा दाखविण्यासाठी शरयू नदीच्या काठावर गेलेत. आम्ही, “राम के नाम वोट” मागणारे नाही. श्रीराम हे आमच्या हृदयात आहेत. हृदयातून रामाची पूजा आम्ही करतो. आणि हे मतांसाठी रामाची आरती करतात.’ आरतीसाठी जे शरयू नदीच्या काठावर आहेत, जनता त्यांना नदीत ढकलल्याशिवाय राहणार नाही. रामाच्या नावाचा बाजार मांडल्या जात आहे. त्याचवेळी वडेट्टीवार यांनी, जनतेला किती वेढ बनवाल. राम राम म्हणून महात्मा गांधींनी प्राण त्यागला. रामरामाने माणसे जोडली जातात. श्रीरामाचा नवीन नारा लावून माणसे तोडण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या मुखात राम मतासाठी आणि आमच्या मुखातील राम पूजनासाठी असल्याचे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिले.

Published on: Apr 10, 2023 09:05 AM
SuperFast News | अयोध्या दौऱ्यावर राजकारण तापलं; राज्याला अवकाळी, गारपिटीनं झोडपलं… पहा सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या
आमचे मुख्यमंत्री संवेदनशील, घराबाहेर पडतात, नाहीतर आधी…; उद्धव ठाकरेंना कुणाचा टोला?