आता निघाले, गाडीत बसले, विमान टेकऑफ, लोकांनी हे बघावं का? अजिर पवारांचा शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका
शिंदे यांना वाटलं की दर्शनाच्या निमित्ताने जावं अयोध्येला जाव. ते जात आहेत. पण आपण कधी दर्शनाला कुठे गेलो की एवढी पब्लिसिटी करत नाही
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. शिंदे आपल्या सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदार, खासदारांसह शरयू नदीची आरती करणार आहेत. तर हा दौरा भव्य दिव्य करण्यासाठी भाजपचेही काही नेते सहभागी होणार आहेत. मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, मोहित कंबोज हे भाजपचे नेते अयोध्येला जाणार आहेत. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
शिंदे यांना वाटलं की दर्शनाच्या निमित्ताने जावं अयोध्येला जाव. ते जात आहेत. पण आपण कधी दर्शनाला कुठे गेलो की एवढी पब्लिसिटी करत नाही. आता निघाले, आता गाडीत बसलेत, आता विमान टेकऑफ झालं, लोकांनी का हेच बघावं का? यापेक्षा लोकांचे दैनंदिन जीवनामध्ये महागाई, बेरोजगारी, कायदा-सुवस्था, कोरोना या महत्त्वाच्या समस्या आहेत. आमचा रोहित सुद्धा गेला होता, आल्या दोन चार बातम्या. ते याच्याआधी सुद्धा शिवसेनेत असताना गेले होते. पण आथा साहजिकच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध मिळणार. ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मंत्री आणि आमदार आणि कार्यकर्ते आहेत. ते दर्शना करता गेलेले आमच्या त्यांना शुभेच्छा…