शिंदेच्या होर्डिंग्जवर पंतप्रधान मोदी, शहा, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ यांचे फोटो
छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो या होर्डिंग्जवर लावण्यात आले असून ‘चलो अयोध्या’ असं शिर्षक देण्यात आलं आहे.
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहेत. ते यावेळी रामललाच्या दर्शनासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. सध्या त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू असून जय्यत तयारी सुरू आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशात लखनऊ अयोध्या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यावरून राज्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.
लखनऊ अयोध्या मार्गावर लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री शिंदेच्या होर्डिंग्जवर पंतप्रधान मोदी, शहा, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो या होर्डिंग्जवर लावण्यात आले असून ‘चलो अयोध्या’ असं शिर्षक देण्यात आलं आहे. तर ‘आशिर्वाद प्रभू श्री रामजी का, तीर कमान प्रतिक हिंदूत्व का’ अशी टॅग लाईन लिहण्यात आली आहे.