योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री शिंदे याच्या भेटीतून चांगलच काहीतरी होईल; केसरकर

| Updated on: Apr 07, 2023 | 12:21 PM

मुंबईतील उत्तर प्रदेश भवना प्रमाणेच तेथे महाराष्ट्र भनव असावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री योगी यांच्या भेटीत सकारात्मक चर्चा होईल

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिल रोजी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चांगल्या कामाची सुरुवातीला प्रभू रामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. त्यासाठी रामराज्य ही संकल्पना आहे. त्याासाठी हा दौरा महत्वाचं असल्याचे केसरकर म्हणाले. तर मुंबईतील उत्तर प्रदेश भवना प्रमाणेच तेथे महाराष्ट्र भनव असावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री योगी यांच्या भेटीत सकारात्मक चर्चा होईल. जे राज्यातून रामाच्या दर्शनाला अयोध्येला जातील त्यांच्यासाठी उत्कृष्ट भवन बांधण्याची आदरणीय मुख्यमंत्रीची यांची मनषा असल्याचेही केसरकर म्हणाले.

Published on: Apr 07, 2023 12:21 PM
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन ‘भाजप’मध्ये रस्सीखेच, ‘मविआ’कडून रवींद्र धंगेकर यांना उतरवणार?
पेणचे बाप्पा समुद्रमोर्गे निघाले विदेश प्रवासाला, ३५०० गणेशमूर्ती रवाना होणार