आयत्या वेळेला सगळं ठरतं, ह्या फक्त निगेटिव्ह चर्चा : राऊतांच्या दाव्यावर शिवसेना नेत्याचा पलटवार
अयोध्या दौऱ्याला शिंदे गटातील काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली यावरून सध्या शिंदे गटात नाराजी सुरू असल्याचे बोलले जात आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता, काहीतरी गडबड असल्याचा दावा केला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका आणि राजकीय चर्चा होताना दिस आहे. यादरम्यान या अयोध्या दौऱ्याला शिंदे गटातील काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली यावरून सध्या शिंदे गटात नाराजी सुरू असल्याचे बोलले जात आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता, काहीतरी गडबड असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शालेय शिक्षण मंत्री, शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी, या फक्त निगेटिव्ह चर्चा आहेत. त्यावर बोलण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. आयोध्या दौरा आयत्या वेळेला ठरला आहे. माझेही कार्यक्रम होते. पण इकडे यावं लागल्याने ते व्हिसीवर घेतले. तर अनेकांचे कार्यक्रम ठरलेले असतात. लोकांच्या घरी लग्न असतात. त्यामुळे त्यांना येता नाही आलं. त्यामुळे या गोष्टीचा असा थेट संबंध जोडण्याचा प्रश्नच येत नाही.
Published on: Apr 10, 2023 12:24 PM