एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का; महाविकास आघाडीच्या ‘या’ निर्णयाला स्थगिती, उद्योगांना फटका बसणार ?

| Updated on: Sep 17, 2022 | 10:02 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धडाका सुरूच आहे. आता उद्धव ठाकरेंच्या आणखी एका निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धडाका सुरूच आहे. आता एमआयडीसी (MIDC) भूखंड वाटपाच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ  शिंदेंकडून स्थगिती देण्यात आली आहे. एक जून 2022 नंतरचा भूखंड वाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या (CM) या निर्णयामुळे 50 हजार कोटींच्या गुंतवणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांना ब्रेक लागू शकतो अशी चर्चा आहे. एकीकडे वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 17, 2022 09:35 AM
अग्निवीरांची आजपासून भरती प्रक्रिया! नागपुरात तब्बल 60 हजार उमेदवार भरतीप्रक्रियेसाठी हजर
‘आदित्य ठाकरेंच्या दापोलीतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी, दीड-दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही!’