‘फडणवीस युती धर्मातला निष्कलंक माणूस’; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख नागपुरचा कलंक असा केला होता. तर त्याविरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी पलटावर करताना, हिजड्यांचे सरदार असा उल्लेख ठाकरे यांचा केला. त्यावरून सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपसून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर खरमरीत टीका केली होती. त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख नागपुरचा कलंक असा केला होता. तर त्याविरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी पलटावर करताना, हिजड्यांचे सरदार असा उल्लेख ठाकरे यांचा केला. त्यावरून सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. तर आता ठाकरे गटही यावरून आक्रमक झाला आहे. यावरूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना, फडणवीस हा खराखुरा निष्कलंक माणूस आहे, 2019 साली कलंकितपणा तुम्ही केला, बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला, अशी टीका केली आहे. ते कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलत होते. यावेळी शिंदे यांनी अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाल्याने निर्माण झालेल्या प्रश्नावरून उत्तर देताना आता त्यावेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. मात्र मी आता मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कोणत्याच आमदारांवर अन्याय होणार नाही. सर्व आमदारांनी मुबलक निधी दिला जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.