Ajit Pawar यांचा गोविंदांच्या नोकरीवरुन राज्य सरकारला सवाल-tv9
कोणत्या निकषावरून तुम्ही गोविंदांना नोकरी देणार असा थेट सवाल विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपला आणि सरकारला केला. चंद्रकांतदादा पाटलांनी उत्तर देताना या विषयावरून अजित पवारांनी आकांड तांडव करण्याची काहीच गरज नाही असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा समावेश साहसी खेळामध्ये केल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या दुसऱ्या घोषणेला जोरदार विरोध होताना आता दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण घोषित केलं. त्यावरून आता राज्यात चांगलंच राजकारण पेटलेलं आहे. गोविंदाच्या नोकरीवरून आता राष्ट्रवादी आणि भाजप हे आमने सामने आलेले आहेत. तर कोणत्या निकषावरून तुम्ही गोविंदांना नोकरी देणार असा थेट सवाल विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपला आणि सरकारला केला. चंद्रकांतदादा पाटलांनी उत्तर देताना या विषयावरून अजित पवारांनी आकांड तांडव करण्याची काहीच गरज नाही असं म्हटलं आहे. तर क्रीडा प्रकारातील पाच टक्के आरक्षणातूनच गोविंदांना नोकरी दिली जाईल. त्यांना वेगळं आरक्षण नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.